top of page

गोष्टींतून संस्कार...
संस्कारांतून व्यक्तिमत्त्व !
रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे, हितोपदेश आणि पंचतंत्रातील निवडक कथा —
मुलांसाठी सोप्या, रंजक आणि संस्कारक्षम शैलीत.
भीष्म स्टोरी टेलिंग म्हणजे काय ?
आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांना गोष्टी सांगण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीतील मूल्यांची ओळख करून देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण होत चालले आहे. पूर्वी आजी-आजोबांच्या गोष्टींतून जे संस्कार सहजपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत होते, ती परंपरा आज हळूहळू दूरावत आहे.
हीच उणीव भरून काढण्यासाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमने ‘भीष्म स्टोरी टेलिंग’ हा ऑनलाइन उपक्रम सुरू केला आहे. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे, हितोपदेश आणि पंचतंत्रातील निवडक कथा मुलांना अत्यंत सोप्या, रंजक आणि आनंददायी शैलीत सांगितल्या जातील.
